Goa Tourism Revenue 2026 Pudhari
गोवा

Goa Tourism Revenue 2026 | गोव्याच्या पर्यटनाची 'नऊपट' कमाई! आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ झाल्याने परदेशी पर्यटकांची गोव्याला पसंती

Goa Tourism Revenue 2026 | पर्यटन मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्याने फायदा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा पर्यटन विभागाने पर्यटन मालमत्ता भाडेतत्त्वावर देऊन मिळवलेल्या महसूलात गेल्या सहा वर्षांत जवळपास नऊपट वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये हा महसूल केवळ २१.३४ लाख रुपये होता, तो २०२५-२६ (डिसेंबर २०२५ पर्यंत) १९०.१२ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात देण्यात आली आहे.

शुक्रवारी गोवा विधानसभेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, राज्यातील पर्यटन मालमत्ता आणि पायाभूत सुविधांचा व्यावसायिक वापर वाढत असल्याने महसूलात सातत्याने वाढ होत आहे.

यासोबतच पर्यटकांची संख्या आणि हॉटेल क्षमताही वाढत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील हॉटेल क्षमता सर्वेक्षणानुसार राज्यात सध्या ९००५ हॉटेल्सचे जाळे असून त्यामध्ये एकूण ७७ २५३ खोल्या आणि १,१९,७१९ बेड उपलब्ध आहेत. कॅटेगरी 'क' हॉटेल्स सर्वाधिक असून त्यांची संख्या ४५०१ आहे.

या हॉटेल्समध्ये ३९२४८ खोल्या आणि ६०, २२८ बेड उपलब्ध आहेत. ३१ मार्च पर्यंतच्या आकडेवारीनुसार हॉटेल्स, पेईंग गेस्ट हाऊसेस आणि इतर निवास सुविधांमुळे वाढत्या पर्यटन मागणीला राज्य सक्षमपणे प्रतिसाद देत असल्याचेही सर्वेक्षणात नमूद आहे. २०२५ पर्यटन व्यापारातूनही महसूल पर्यटन व्यापार नोंदणी आणि नूतनीकरणातून २०२५-२६ या आर्थिक वर्षात (डिसेंबर २०२५ पर्यंत) १०५१.५८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे, ज्यामुळे पर्यटन विभागाच्या उत्पन्नात आणखी भर पडली आहे.

विमान आणि क्रूझ पर्यटन

आर्थिक सर्वेक्षणानुसार मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा अधिक मजबूत झाली आहे. दाबोळी विमानतळ आणि मोपा विमानतळ मिळून २०२३ मध्ये १४१६ आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली व १,९५, ६७ परदेशी पर्यटक आले.

२० २५ मध्ये उड्डाणांची संख्या १७८४ झाली आणि २,३५,७९८ परदेशी पर्यटक गोव्यात आले. चार्टर पर्यटनही राज्यासाठी महत्त्वाचे ठरत असून २०२५ मध्ये १८९ चार्टर उड्डाणांमधून ४०,३३६ परदेशी पर्यटक गोव्यात आले. तसेच क्रूझ पर्यटनातूनही पर्यटक येत असून २०२५ मध्ये क्रूझ जहाजांमधून १०,०८६ परदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले, ज्यामुळे राज्याच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळाली आहे.

पर्यटकांची संख्या वाढली

राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढली आहे. २०२१ मध्ये देशांतर्गत पर्यटकांची संख्या ३३ लाखांहून अधिक होती. २०२५ मध्ये ती वाढून १.०२ कोटींहून अधिक झाली. २०२१ मधील ३३,३०,२१७ वरून २०२५ मध्ये १,८,०२, ४१० पर्यंत वाढले. २०२२ मध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली असून त्या वर्षी पर्यटक आगमनात ११५ टक्क्यांची झेप घेतली, ज्यामुळे कोविडनंतर पर्यटन क्षेत्राची मजबूत पुनरुज्जीवन प्रक्रिया दिसून आली. परदेशी पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे. २०२१ मध्ये २२,१२८ परदेशी पर्यटक गोव्यात आले होते. २०२५ मध्ये ही संख्या वाढून ५, १७, ८०२ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT