Goa News 
गोवा

Goa Tourism 2026 | गोव्यात पर्यटकांचा बारामाही ओघ! सुट्टीच्या दिवशी पर्यटन स्थळांवर 'हाऊसफुल्ल' गर्दी

Goa Tourism 2026 | राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू असून पावसाळा असो वा उन्हाळा असो बारा महिने गोव्यात पर्यटक येत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू असून पावसाळा असो वा उन्हाळा असो बारा महिने गोव्यात पर्यटक येत आहेत. शनिवारी-रविवारी सुट्टीच्या दिवशी राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते.

रविवारी जुने गोवे चर्च परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामध्ये देशी पर्यटकांची संख्या मोठी होती. सकाळी अंतर्गत भागातील पर्यटन क्षेत्राला भेटी देणारे पर्यटक संध्याकाळनंतर समुद्रकिनाऱ्यावर समुद्रस्नानासाठी जातात. त्यामुळे सायंकाळनंतर समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी दिसून येते. देशी पर्यटकांची गर्दी वाढत असून आता विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने गोव्यात येताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT