पणजी : पुढारी वृत्तसेवा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी कदंब वाहतूक महामंडळाने विशेष गाड्यांची सोय केली आहे. पंढरपूर येथे विठूमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. जणू भक्तीचाच मेळा भरत असतो.
टाळमृदुंगाच्या तालावर श्री विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन होऊन अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने जात असतात. गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक पंढरपूरला जात असतात. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कदंब वाहतूक महामंडळाने गोवा ते पंढरपूर या मार्गावर विशेष गाड्यांची सोय केली आहे.
२४ व २५ जुलै रोजी गोव्यातील विविध ठिकाणांवरून या बसगाड्या सुटणार आहेत. गोवा ते पंढरपूर तिकीट ५०० रुपये असणार आहे. रुपये आहे. अधिक माहितीसाठी कदंब वाहतूक महामंडळाच्या तिकीट विक्री केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेळापत्रक :
२४ जुलै सकाळी ८.४५ : मडगाव-पणजी म्हापसा पेडणे, सकाळी ११ : वास्को-पणजी-म्हापसा - पेडणे, दुपारी १२ : मडगाव - फोंडा - मौले - बेळगाव दिनांक
२५ जुलै सकाळी ६.३० : पणजी-म्हापसा - पेडणे - सावंतवाडी, पणजी - म्हापसा पेडणे सकाळी ८.४५ : मडगाव -, सकाळी ११: वास्को- पणजी-म्हापसा पेडणे, सकाळी ११: पणजी म्हापसा साखळी - बेळगाव, दुपारी १२: मडगाव - फौंडा-मौले- बेळगाव, दुपारी २.५० : पणजी - म्हापसा -पेडणे - सावंतवाडी