Exam Pudhari
गोवा

Goa - स्पर्धा परीक्षेच्या चक्रात पुन्हा अडकायचे नाही म्हणून...

कुडतरीत विद्यार्थ्यांची आत्महत्या : नीट परीक्षा रद्द झाल्याने घेतला गळफास

पुढारी वृत्तसेवा

Avoiding the competitive exam cycle in Goa for better career options

मडगाव : डॉक्टर होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून अहोरात्र अभ्यास करणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने अखेर स्पर्धा परीक्षांच्या प्रचंड मानसिक दबावापुढे हार मानत जीवनयात्राच संपवली. 'नीट-यूजी २०२६' परीक्षा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावातून मायना-कुडतरी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 'मला पुन्हा स्पर्धेच्या चक्रात अडकायचे नाही,' अशी वेदनादायी सुसाइड नोट पोलिसांना घटनास्थळी सापडल्याने संपूर्ण परिसर हळहळला.

मृत विद्यार्थी मूळचा बेंगळुरु येथील असून तो मडगाव परिसरातील एका नामांकित उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो गेले वर्षभर 'नीट' परीक्षेची कठोर तयारी करत होता. शांत, अभ्यासू आणि शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. कुटुंबीयांनीही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या होत्या. मात्र, 'नीट' परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर परीक्षा रद्द होण्याच्या निर्णयामुळे तो प्रचंड मानसिक दबावाखाली गेला होता, अशी माहिती त्याच्या परिचितांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास विद्यार्थ्याने घरात कोणीही नसताना टोकाचे पाऊल उचलले. त्याची आई आणि बहीण काही दिवसांसाठी मूळ गावी गेल्या होत्या, तर वडील रेल्वेमध्ये गार्ड म्हणून ड्युटीवर होते. घरात एकटाच असलेल्या विद्याथ्यर्थ्यान आपल्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. सायंकाळी वडील कामावरून घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच मायना-कुडतरी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी केली असता तेथे विद्यार्थ्याने लिहून ठेवलेली सुसाइड नोट सापडली. या चिठ्ठीत त्याने स्पर्धा परीक्षांचा वाढता ताण, भविष्यासंबंधीची भीती आणि पुन्हा। परीक्षेच्या प्रक्रियेतून जाण्याची मानसिक तयारी नसल्याचे नमूद केल्याचे समजते.

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपा...

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आता आली आहे. स्पर्धा परीक्षा हेच आयुष्याचे अंतिम ध्येय नसून, मुलांना भावनिक आधार, समुपदेशन आणि संवादाची गरज अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT