Goa State Cultural Awards  
गोवा

Goa State Cultural Awards | गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा

Goa State Cultural Awards | राज्य पुरस्कारांसाठी १२ तर युवा सृजन पुरस्कारांचे सहाजण मानकरी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कला आणि संस्कृती संचालनालयाने २०२५-२६ या वर्षासाठीचे प्रतिष्ठित गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक संस्था पुरस्कार तसेच युवा सृजन पुरस्कार (नवसर्जन-चेतना पुरस्कार) जाहीर केले आहेत.

कला, साहित्य, संगीत, नाटक, भजन, तियात्र, लोककला आणि शिल्पकला यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलेल्या कलाकारांचा या पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात येणार आहे. गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत यंदा १२ मान्यवर कलाकारांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये संगीत क्षेत्रात रजनी ठाकूर (तिसवाडी), अग्नेलो जोआओ फर्नाडिस (सासष्टी) आणि रामचंद्र नाईक (डिचोली) यांची निवड झाली आहे. भजन क्षेत्रात गुरुदास म. शिरगावकर (डिचोली), साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी रमेश वंसकर (फोंडा) आणि डॉ. जयंती नाईक (केपे), नाट्य क्षेत्रात ज्योती कुंकळकर (फोंडा) आणि चंद्रकांत गावस (सत्तरी), तियात्र क्षेत्रातील योगदानासाठी इरीन पिएदादे कार्दोज (बार्देश) आणि दुमिंगो कुएल्हो (फोंडा) यांची निवड झाली आहे.

लोककला क्षेत्रातील कार्यासाठी विनायक फडते आखाडकर (फोंडा) यांना तर ललित कला क्षेत्रातील योगदानासाठी महेश वेंगुर्लेकर (तिसवाडी) यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांत प्रत्येकी एक लाख रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि नटराजाची प्रतिकृती देण्यात येणार आहे.

युवा कलाकारांचाही बहुमान !

युवा कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या युवा सृजन पुरस्कार (नवसर्जन-चेतना पुरस्कार) साठी यंदा सहा जणांची निवड करण्यात आली आहे. नाट्य क्षेत्रातून सौरभ म. कारखानीस (तिसवाडी) आणि गोविंद नाईक (पेडणे), लोककला व हस्तकला क्षेत्रात विशांत गावडे (फोंडा), भजन क्षेत्रात गौतम गावस (सत्तरी), साहित्य क्षेत्रात दीपराज सातार्डेकर (फोंडा) आणि शिल्पकला क्षेत्रात उमाकांत पोके (पेडणे) यांची निवड करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT