CM Dr. Pramod sawant 
गोवा

Goa ST political reservation | गोव्यात अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा! एका महिन्यात प्रक्रिया पूर्ण होणार

Goa ST political reservation | लोकसंख्येनुसार मतदारसंघ निश्चित होणार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अनुसूचित जमाती (एसटी) समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत मतदारसंघ निश्चित करण्याची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शनिवारी पणजी येथे भाजप कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

एसटी राजकीय आरक्षणासाठी नियुक्त आयुक्त लोकसंख्येच्या आकडेवारीचा विचार करून मतदारसंघ निश्चित करतील, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे २००१ च्या जनगणनेच्या संदर्भावरून कोणताही संभ्रम बाळगण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेत अनुसूचित जमातीला राजकीय आरक्षण देण्यासंदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारने योग्य कायदेशीर पुनरावलोकनानंतर जारी केली आहे.

या प्रक्रियेसाठी नियुक्त आयुक्तांकडून लोकसंख्येची आकडेवारी विचारात घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
सखोल कायदेशीर तपासणीनंतर संबंधित विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यात अनुसूचित जमातीला राजकीय आरक्षण देण्याची संपूर्ण प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT