Central government | कसाब, हाफिज सईद यांनाही जामीन देणार का? 
गोवा

Goa ST Political Reservation | 'एसटी आरक्षण'च्या अंमलबजावणीला गती द्या

Goa ST Political Reservation | मंत्री तवडकर, गावडेंसह एसटी नेते भेटले मुख्यमंत्री, दामू नाईक यांना

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अनुसूचित जमाती तथा आदिवासी (एसटी) च्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन एसटींना राजकीय आरक्षण त्वरीत देण्यासाठी हालचाल करण्याची मागणी निवेदन देऊन केली. आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांच्या नेतृतवाखालील या शिष्टमंडळात, सभापती डॉ. गणेश गावकर, आमदार गोविंद गावडे व आंतोन वाझ, तसेच एसटी नेते व माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर तसेच अन्य एसटी नेते उपस्थित होते.

डॉ. सावंत व नाईक यांना दिलेल्या निवेदनात एसटी नेत्यांनी, गोव्यात एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीला गती देण्याची विनंती केली. त्यानंतर बोलताना तवडकर यांनी सांगितले की, या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे.

ती भेट लवकर ठरवण्याची मागणी आम्ही केली आहे. भाजपने राज्य व केंद्रीय स्तरावर एसटी आरक्षणाच्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत आणि त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीपूर्वी निश्चितपणे एसटींना आरक्षण मिळणार आहे, असे तवडकर म्हणाले.

मतदारसंघ आयोग ठरवेल

मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगितले, की एसटीचे शिष्टमंडळ आपणास भेटले. राज्यात एसटींना राजकीय आरक्षण लवकरच मिळेल, अधिसूचना लवकर काढली जाईल, असे सांगून कोणते मतदारसंघ राखीव होतील ते निवडणूक आयोग ठरवेल, असे डॉ. सावंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT