Goa Mankurad Mango 
गोवा

Mankurad Mango | मडगावात 'मानकुराद'ची आवक वाढली

Mankurad Mango | चांगल्या दर्जाचा आंबा २५०० ते ३००० रुपयांत उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

गोव्याचा प्रसिद्ध व सुगंधी असा मानला जाणारा मानकुराद आंबा आपल्या खास चवीमुळे आणि दर्जामुळे ओळखला जातो. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मागणी असलेला हा आंबा हंगामातच मर्यादित काळासाठी उपलब्ध असून, याची सध्या आवक वाढल्याने मडगाव बाजार येथे घाऊक बाजारात २५०० ते ३००० या चांगल्या दरात दर्जेदार आंबा उपलब्ध होत आहे.

गोव्यात आंबा हंगाम सध्या शगेला पोहोचला असून, बाजारात मोठ्या प्रमाणावर आंब्यांची आवक होत आहे. विविध प्रकारच्या आंब्यांसह मानकुराद आंबा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आला आहे.

त्यामुळे यावर्षी आंब्यांच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेने दर कमी सध्या चांगल्या मानकुराद आंब्याचे दर सुमारे २५०० ते ३००० रुपये इतके आहेत, जे मागील वर्षांच्या तुलनेत कमी मानले जात आहेत चांगल्या उत्पादनामुळे पुरवठा वाढल्याने दर स्थिर राहिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आंबा परवडणाऱ्या किमतीत मिळत आहे.

दर कमी झाल्याने ग्राहक वळले बाजाराकडे

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मानकुराद आंब्याचा हंगाम अजून काही आठवडेच राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी लवकर खरेदी करावी, असा सल्ला मानकुराद आंबे विक्रेत्यांनी दिला आहे. दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही आंब्याचा आनंद घेता येत असून बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT