International Ayush Conference Dubai 2026 
गोवा

International Ayush Conference Dubai 2026 | दुबईतील आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत गोव्याची वेलनेस पर्यटनदृष्टी झळकली

International Ayush Conference Dubai 2026 | दुबईत रंगली आंतरराष्ट्रीय आयुष परिषद; गोव्याच्या 'वेलनेस पर्यटना'चे जागतिक स्तरावर सादरीकरण

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दुबई येथे आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनात गोव्याने प्रभावी सहभाग नोंदवत वेलनेस पर्यटन क्षेत्रातील आपली दृष्टी मांडली. विज्ञान भारती यांच्या वतीने वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे १५ ते १७फेब्रुवारीदरम्यान हा कार्यक्रम होत असून, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने तो आयोजित करण्यात आला आहे.

सदर परिषदेचे उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हस्ते झाले. यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, यूएईतील भारताचे राजदूत डॉ. दीपक मित्तल तसेच दुबई हेल्थ अथॉरिटीचे महासंचालक डॉ. अलावी अल शेख अली उपस्थित होते.

एव्हिडन्स बेस्ड आयुष इंटरवेंशन्स इन माईंड बॉडी हेल्थ हा परिषदेचा मुख्य विषय आहे. गोव्याचा स्टॉल हा माहिती व प्रसिद्धी संचालनालयामार्फत आला असून उभारण्यात पर्यावरणपूरक संकल्पनेमुळे तो विशेष आकर्षण ठरेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

गोव्याच्या या प्रतिनिधी मंडळात ऑल्विन झेवियर परेरा (माहिती अधिकारी), डॉ. मीनल जोशी (उपसंचालक, आयुष), डॉ. समीर सादेकर (वरिष्ठ आयुर्वेदिक वैद्य, आसिलो रुग्णालय, म्हापसा), डॉ. दिपलई शिरवईकर व डॉ. शांभवी गाडगीळ यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी सादरीकरण...

माहिती व प्रसिद्धी संचालक दीपक बांदेकर म्हणाले, या परिषदेतील सहभागामुळे गोव्याला जागतिक वेलनेस पर्यटन केंद्र म्हणून बळकटी मिळाली आहे. आयुर्वेदाला पर्यटन विविधीकरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानत राज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी सादरीकरण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT