पणजी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या पाच वर्षांत गोव्यात शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या एकूण १२ घटना नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणांपैकी तीन प्रकरणांमध्ये पोलिसांनी न्यायालयात प्रकरणे बंद करण्यासाठीचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) दाखल केला असून एका प्रकरणात आरोपीची निर्दोष सुटका झाली आहे.
उर्वरित आठ प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. पोलिसांच्या नोंदींनुसार, या घटना शाळेच्या परिसरात, शाळेच्या बसमध्ये, सार्वजनिक वाहतुकीत तसेच इतर ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे.
तपासानंतर दोन प्रकरणांत 'ए' फायनल तर एका प्रकरणात 'सी' फायनल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
शाळा व महाविद्यालयांना शिक्षण खात्याने कर्मचाऱ्यांवर व अनोळखी व्यक्तींवर कडक देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. याशिवाय, शाळेच्या बसमध्ये महिला कर्मचारी नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मानवी तस्करी विरोधी पथक, पणजी, स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) सहकार्याने गोव्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये मानवी तस्करीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृत कार्यक्रम आयोजित करण्यात ये आहेत.
यामध्ये पोश, पोक्सो, सायक गुन्हे यांसारख्या विषयांचा, बाट हक्कांचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांचा, तसेच शाळा महाविद्यालयांच्या आवारात आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे गुन् रोखण्यासाठी मार्गदर्शन केले जा असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
577 शाळांमध्ये सीसीटीव्ही
शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परिसरात नियमित पोलिस गस्त ठेवली जात आहे. तसेच शाळा व्यवस्थापनासोबत समन्वय साधून शाळा परिसर आणि बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावर भर देण्यात येत आहे. सुमारे ५७७ शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.