Digital Arrest Scam | वृद्धेला दीड महिना डिजिटल अरेस्ट ठेवून १४ लाख उकळले file photo
गोवा

Goa Digital Arrest Fraud | 'डिजिटल अरेस्ट'द्वारे वृद्धाला 80 लाखांना गंडा

Goa Digital Arrest Fraud | सासष्टी तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला खंडणीच्या प्रकरणाशी, बेकायदेशीर जाहिरात-बाजीच्या कृत्यांमध्ये तसेच मानवी तस्करीत गुंतल्याचे सांगून 'डिजिटल अरेस्ट' द्वारे ८० लाखांचा गंडा घालण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सासष्टी तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला खंडणीच्या प्रकरणाशी, बेकायदेशीर जाहिरात-बाजीच्या कृत्यांमध्ये तसेच मानवी तस्करीत गुंतल्याचे सांगून 'डिजिटल अरेस्ट' द्वारे ८० लाखांचा गंडा घालण्यात आला.

या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने त्या व्हॉटस्अॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सासष्टीतील ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला कर्नाटक पोलिस खात्यातील निरीक्षक असल्याचे भासवून एका व्हॉटस्अॅप क्रमांकावरून कॉल करण्यात आला.

संशयिताने तक्रारदाराचा खंडणीच्या बेकायदेशीर प्रकरणाशी, जाहिरात-बाजीच्या कृत्यांमध्ये, तसेच मानवी तस्करीत सहभागी असल्याचे खोटेच सांगितले. तसेच त्याच्याविरोधात कर्नाटकातील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असल्याचेही सांगितले.

तक्रारदाराला १० एप्रिल ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत बनावट वारंट पाठवून 'डिजिटल अरेस्ट' द्वारे दबाव टाकण्यात आला. हे प्रकरण मिटविण्यासाठी तक्रारदाराला विविध बँक खात्यांत ८० लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर फसवणूक झाल्यानंतर तक्रारीची दखल घेऊन पोलिस निरीक्षक अनुष्का पै बीर यांनी व्हॉटस्अॅप मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT