Gautam Khattar arrested  
गोवा

Goa Row Gautam Khattar arrest -गौतम खट्टरला हिमाचल प्रदेशमध्ये अटक; प्रकरणात मोठी घडामोड

कुल्लूमधून घेतले ताब्यात ; हिमाचल पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या गौतम खट्टर याच्या मुसक्या अखेर हिमाचल प्रदेश पोलिसांनी कुल्लू येथे शुक्रवारी (दि. २४) आवळल्या. गौतम खट्टर यापूर्वी त्याचा भाऊ माधव यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

तोही गौतमसोबत गोव्यात कार्यक्रमाला उपस्थित होता. कार्यक्रमाआधी गौतमच्या वतीने तोच आयोजकांशी बोलणी करायचा. त्यानेच गौतमला भाषण लिहून दिले होते. त्यानंतर भाषणाचा व्हिडीओही रेकॉर्ड करून समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता. त्यामुळे त्याला सहसंशयित करण्यात आले आहे. गौतम देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. हरिद्वारमधून गोव्यात आणलेल्या माधवला न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गौतमला आणण्यासाठी परेश नाईक कुल्लूत

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक परेश नाईक गौतमला ताब्यात घेण्यासाठी कुल्लू येथे गेले आहेत. त्यांनी सांगितले की, २४ तासांत काही तांत्रिक अडचण निर्माण झाली नाही, तर गौतमला विमानाने आणले जाईल, अन्यथा आज (दि. २५) ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला रेल्वेने गोव्यात आणले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT