RG MLA Viresh Borkar  
गोवा

Viresh Borkar RG Party Goa | 'आरजी'कडूनच विधानसभा लढविणार

Viresh Borkar RG Party Goa | आमदार वीरेश बोरकर; पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षांतर्गत वादावर भाष्य करणार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आपण पक्ष सोडणार नाही. रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षातर्फेच सांत आंद्रे मतदारसंघा-तून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पक्षातील वादावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन बोलेन, असे स्पष्टीकरण आमदार वीरेश बोरकर यांनी केले. सोमवारी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सांत आंद्रे मतदारसंघाच्या विकासासाठी आपले अथक परिश्रम सुरू आहेत.

आमदार म्हणून आपण सांत आंद्रे मतदारसंघातील समस्या वारंवार विधानसभेत व इतर ठिकाणीही मांडलेल्या आहेत. ) पर्यावरण संरक्षण व्हावे, त्याचबरोबर शेत जमिनी यांचे संरक्षण व्हावे, ३९ ए कलम रद्द व्हावे, यासाठी आपण सतत लढत आहे आणि पुढेही लढत राहणार आहे, असे बोरकर म्हणाले.

ते म्हणाले, गेले काही दिवस आपण गोव्याबा हेर होतो. त्यामुळे पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहू शकलो नव्हतो. आता आपण पक्षाच्या कार्यालयात जाऊन या विषयावर पक्षाच्या पदाधिकारी चर्चा करणार आहे.

त्यानंतर या वादावर बोलणार आहे. पक्ष ताब्यात घेण्याचा आपला कोणताही विचार नाही. मनोज परब हे आपले नेते असल्याचे सांगताना मात्र, त्यांच्या राजीनाम्यावर बोलणे बोरकर यांनी टाळले.

मनोज परब यांना मुख्यमंत्री बनविणार...

आमदार वरिश बोरकर यांनी एका वृत्तवाहिनी बोलताना सांगितले की, आपण पक्ष सोडणार या अफवा आहेत. आरजीचे काम राज्यभरात सुरू आहेत. संघटनेची बांधणीही चांगली आहे. २०२७ च्या निवडणुकीनंतर मनोज परब यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करून त्यांना गुरुदक्षिणा देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT