Goa Micky Pacheco  
गोवा

Goa Micky Pacheco | मिकी पाशेको बाणावलीतून तर पत्नी नुवेतून लढणार

Goa Micky Pacheco | आगामी निवडणूक बाणावली मतदारसंघातून आपण स्वतः तर नुवे मतदारसंघातून आपली पत्नी व्हिओला पाशेको लढणार असल्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांनी स्पष्ट केले.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

आगामी निवडणूक बाणावली मतदारसंघातून आपण स्वतः तर नुवे मतदारसंघातून आपली पत्नी व्हिओला पाशेको लढणार असल्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांनी स्पष्ट केले. तसेच, काँग्रेस पक्षामध्ये पैशांच्या बदल्यात तिकिटांची विक्री होते, त्यामुळे काँग्रेसने उमेदवारी दिली तरी आपण ती घेणार नसल्याचेही ते म्हणाले.

माजी मंत्री मिकी पाशेको यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, बाणावली मतदारसंघातून यापूर्वी आपण तीनवेळा निवडून आलो असून, यावेळीही तिथूनच निवडणूक लढवणार आहे. तसेच, नुवे मतदारसंघातून पत्नी व्हिओला पाशेको नशीब आजमावतील.

ही निवडणूक नेमकी कोणत्या पक्षाकडून लढणार, याचा निर्णय अद्याप झाला नसून ते एक 'सरप्राईज' असेल, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेस पक्ष आता पूर्णपणे कॉम्प्रमाईझ करणारा पक्ष झाला आहे. त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी तीन महिन्यांपूर्वीच वेळ दिला होता, तसेच निवडणुकीचा खर्चही आपणच करू असे सांगितले होते.

मात्र त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. ज्या दिवशी आपण बाहेर पडू, त्या दिवशी आपली संघटना काँग्रेसपेक्षा मोठी असल्याचे दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, २०१२ मध्ये काँग्रेस नको म्हणून सर्वांनीच पाठिंबा दिल्यामुळे आपणही भाजपला पाठिंबा दिला होता. कधीकाळी सागरासमान असणारा काँग्रेस पक्ष आता एका तळ्याएवढाच राहिला आहे. उरलेले नेतेही काँग्रेस संपवत असून ते भाजपशी फितूर आहेत, अशी टीका मिकी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT