Goa DMT Drug Seized  Pudhari
गोवा

Goa Drugs Seizure Case | चार महिन्यांत 90 ड्रग्जविक्रेते गजाआड

Goa Drugs Seizure Case | आठवड्याला पाचजणांविरुद्ध कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात २०२६ च्या पहिल्या चार महिन्यांत अमलीपदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये दर आठवड्याला सरासरी पाचपेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत राज्यभरात नोंद झालेल्या विविध अमली पदार्थ प्रकरणांत एकूण २० जणांना अटक करण्यात आली असून, जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे ३.५ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ५० बिगर गोमंतकीय, २९ गोमंतकीय आणि ११ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. विदेशी आरोपी हे नायजेरिया, अमेरिका, नेपाळ, इस्रायल, फ्रान्स, गिनी आणि ग्रीस या देशांतील असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्हानिहाय पाहता, उत्तर गोव्यात सर्वाधिक ३२ प्रकरणे, दक्षिण गोव्यात १९ प्रकरणे, तर अंमलीपदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) ९ प्रकरणे नोंदवली आहेत. पोलिसांनी राज्यातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात सक्रिय असलेल्या संशयित ड्रग्ज विक्रेत्यांवर लक्ष ठेवून कारवाई सुरू केली आहे.

हे ड्रग्जविक्रेते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ड्रग्ज व्यसनाकडे आकर्षित करत आहेत. दरम्यान, २०२५ मध्ये २०२४ च्या तुलनेत अमली पदार्थ जप्तीच्या मूल्यात तब्बल ७०० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहितीही समोर आली आहे.

सरकारने ड्रग्ज नेटवर्क मोडून काढण्यासाठी 'मुख्यच सूत्रधार', मोठे पुरवठादार आणि वितरकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सोशल मीडिया, डार्क वेब आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे चालणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यवहारांवरही पोलिसांचे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT