कणकवली पोलिसांचे पथक पुण्याला रवाना (File Photo)
गोवा

Dona Paula Robbery | गोव्यातील दरोड्याचा 'दिल्ली कनेक्शन' उघड! सातव्या दरोडेखोरासाठी क्राईम ब्रँचचे पथक दिल्लीला रवाना

Dona Paula Robbery | दोनापावला, म्हापसा दरोडा : क्राईम ब्रँचच्या चौकशीत उघड

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दोनापावला व म्हापसा दरोडा घालताना शस्त्रधारी दरोडेखोरांनी बुरखे घातले होते, त्यामुळे अटक केलेल्या दरोडेखोरांची दंडाधिकाऱ्यांसमोर ओळख परेड तसेच चोरलेला ऐवज जप्त करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. दरोडा घातल्यानंतर चोरलेली रोख रक्कम तसेच दागिने त्यांनी लगेचच आपसात वाटून घेतल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

दरम्यान, क्राईम ब्रँच पोलिसांनी दिल्लीहून आलेल्या ६ दरोडेखोरांची जबानी नोंद केली असली, तरी पुरेशी ठोस माहिती हाती लागलेली नाही. सातवा दरोडेखोर अजून दिल्लीतच असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी क्राईम ब्रँचचे पथक आज ८ मे रोजी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

दरोडेखोरांनी दरोड्यावेळी शस्त्रे खरेदी केली होती. मडगावातील एका दुकानातून ती घेतली हे सिद्ध झाले असले, तरी ती सर्व जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरोडा घातल्यानंतर दरोडेखोर कोणत्या मार्गाने गेले त्याचे पुरावे मिळवण्यात येत आहेत. दोन्ही दरोड्यांमधील दरोडेखोर तेच असून रोख रक्कम व दागिने पलायन करण्यापूर्वी त्यांनी वाटून घेतले. त्यानंतर सर्व दरोडेखोर वेगवेगळ्या मार्गाने मेघालयमार्गे पसार झाले होते.

मेघालयमधून बांगला देशात जाण्यासाठी तेथील सीमा रेषेवरील काही एजंटांची मदत घेण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्याचीही शहानिशा करून मदत करणाऱ्या एजंटांचाही शोध घेण्यात येत आहे. दरोडेखोरांनी दागिने कोठे विकले याचाही तपास सुरू आहे.

...तर ट्रान्स्फरसाठी अर्ज

मिळालेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच पोलिसांनी ६ दरोडेखोरांना दोनापावला येथील प्रकरणात अटक केली आहे. त्यांची पोलिस कोठडी सोमवारी (दि. ११ मे) संपणार आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवल्यास म्हापसा दरोडा प्रकरणात ट्रान्स्फरसाठी अर्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT