Goa Police File Photo
गोवा

Goa Police | अमली पदार्थाविरोधात गोवा पोलीस आणि एनसीसीची संयुक्त जनजागृती मोहीम

Goa Police | 19 ऑक्टोबरला आंतरराज्यीय मोटरसायकल रॅली

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अमली पदार्थमुक्त भारत अभियानाला बळ देण्यासाठी गोवा पोलीस आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १९ ऑक्टोबर रोजी आंतरराज्यीय मोटरसायकल रॅली, तसेच कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर युवकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या मोहिमेत खालील उपक्रम राबवले जाणार आहेत.

मोटरसायकल रॅलित अमली पदार्थाविरोधातील संदेश देण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी गोवा, केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटक पोलीस संयुक्तपणे रॅलित सहभागी होणार आहेत. कळंगुटमध्ये जनजागृतीत सुमारे २५० एनसीसी कॅडेट्सच्या सहभागातून युवकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती केली जाणार आहे.

युवकांचा सहभागाने अमली पदार्थांच्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची माहिती देऊन युवकांना व्यसनमुक्त समाजाचे दूत बनविण्याचा उद्देश आहे. शैक्षणिक उपक्रमांमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्याने, चर्चासत्रे आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्यावर भर दिला जाणार आहे.

गोव्याचे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी या उपक्रमाच्या नियोजनासाठी गोवा नेव्हल एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सुमित सिन्हा यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत उपस्थित होत्या.

अमली पदार्थमुक्त भारताचे उद्दिष्ट:

पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी अमली पदार्थाविरोधातील लढ्यासाठी विविध संस्थांमधील समन्वय आणि युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. एनसीसीची शिस्त आणि पोलिसांची जनसंपर्क यंत्रणा यांच्या माध्यमातून अमली पदार्थाविरोधात जनजागृती अधिक प्रभावी करण्याचा या संयुक्त मोहिमेचा उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT