गोवा

Goa Panchayat Election Results : भाटी पंचायतीवर आमदार सुभाष फळदेसाई यांचा झेंडा

मोनिका क्षीरसागर

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : सांगे मतदारसंघातील भाटी पंचायत क्षेत्रातील सातही प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या मतदारसंघात चार भाजपचे तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे. यातील अपक्ष उमेदवार भाजपला पाठिंबा देणार असल्याने भाटी पंचायतीवर स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई यांचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

प्रभाग १ मधून सुनैना कर्पे, प्रभाग २ मधून उमेश नाईक, प्रभाग ३ मधून उदय नाईक, प्रभाग ४ मधून विजेंद्र वेळीप, प्रभाग ५ मधून प्रियांका गावकर, प्रभाग ६ मधून आश्विनी गावकर, प्रभाग ७ मधून चंद्रकांत गावकर हे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग ३ मधून निवडून आलेले उदय गावकर यांनी सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकत गोवा पंचायती निवडणुकीत हॅट्ट्रिक केली आहे. सुनैना कर्पे, उमेश नाईक, प्रियांका गावकर, चंद्रकांत गावकर यांनी भाजपला पाठिंबा दिला असून, अपक्ष उमेदवार वीरेंद्र वेळीप हेसुद्धा भाजपला पाठिंबा देणार असल्याचे समजते.

SCROLL FOR NEXT