Goa 
गोवा

Goa News | भजन स्पर्धेत केरी सत्तरीचे श्री आजोबा कल्चरल असोसिएशनचे भजन पथक प्रथम

सोनाली जाधव

पणजी; पुढारी वृत्तसेवा : अखिल गोवा भजन स्पर्धेमध्ये श्री आजोबा कल्चरल असोसिएशन केरी सत्तरी या भजनी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा तिसवाडी तालुक्यातील कुडका येथील श्री नागेश महारुद्र भजनी मंडळ, कला-संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित केली होती. श्रावण मासानिमित्त कुडका येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. दुसरा क्रमांक श्री लक्ष्मी भजनी मंडळ (सावईवेरे, फोंडा) या पथकाला व श्री सातेरी केळबाय कला व सांस्कृतिक मंडळ (लाडके सत्तरी) या पथकाला तिसरा क्रमांक मिळाला. श्री शारदा संगीत विद्यालय वास्को व श्री शंकरनाथ भजनी मंडळ चरावणे सत्तरी यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली.

कुडका येथे अ.गो. भजन स्पर्धा, श्री आजोबा भजनी मंडळाला पहिला क्रमांक

तिसवाडी तालुक्यातील कुडका येथील श्री नागेश महारुद्र भजनी मंडळ, कला-संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या स्पर्थेत श्री शांतादुर्गा भजनी मंडळ कवळे फोंडा या पथकाला उत्कृष्ट गजरासाठीचे बक्षीस देण्यात आले. उत्कृष्ट गायकाचा पुरस्कार गौतम गोपीनाथ गावस श्री आजोबा कल्चरल असोसिएशनचे केरी सत्तरी यांना मिळाला. उत्कृष्ट गवळण गायनाचे बक्षीस उमेश फळ (श्री सातेरी केळबाय भजनी मंडळ, पोडोसे सत्तरी) यांना मिळाले. अभंग गायनाचे पहिले बक्षीस लाडफे भजनी मंडळाचे रघुनाथ परब यांना मिळाले. श्री शंकरनाथ भजनी मंडळ चरावणे सत्तरीच्या अमोल गावस यांना उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून निवड करण्यात आली. तर उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून श्री शारदा संगीत विद्यालय वास्कोचे अमेय पटवर्धन यांना पहिले बक्षीस प्राप्त झाले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT