Orange Alert : आज 'ऑरेंज अलर्ट'; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता Pudhari File Photo
गोवा

Goa Orange Alert | राज्यात आज ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

Goa Orange Alert | सासष्टी तालुक्यात विविध ठिकाणी पडझड; वाहतूक विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी ३० जून आणि १ जुलै या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, उत्तर आणि दक्षिण गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. याशिवाय २ ते ६ जुलै या कालावधीसाठी यलो अलर्ट कायम राहणार आहे.

सततच्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत गोव्यात सरासरी साडेतीन इंच पावसाची नोंद झाली आहे. साखळीत सर्वाधिक पाऊस पडला. राज्यात आतापर्यंत २४ इंच, तर काणकोणमध्ये तब्बल ४२ इंच पावसाची नोंद झाली. पावसाची तूट आजपर्यंत ३४ टक्क्यांवर आली असून पुढील २४ तासांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

व्होळांत-वास्कोत घरावर कोसळला भला मोठा दगड

गेले दोन तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे वास्कोमधील व्होळांत येथे एक मोठा दगड कोसळत येऊन प्रमोदनी नाईक यांच्या घरावर आदळला. यात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, यात कोणीही जखमी झाले नाही.

वास्को अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी परिसर सुरक्षित करण्यास व नुकसानीचा आढावा घेण्यास मदत केली. स्थानिक काँग्रेस नेते आणि प्रभाग नगरसेवक नंददीप राऊत म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून संरक्षक भिंत बांधण्यासाठी वारंवार विनंत्या करण्यात आल्या होत्या, परंतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

24 तासांत पडलेला पाऊस (मिमी)

मडगाव : १२६.१

साखळी : ११८.४.

सांगे : ९७.५

केपे : ८५.६

धारबांदोडा : ७८.३

वाळपई ७६.२

पेडणे ६५.४

म्हापसा ६१.८

जुने गोवे : ५८.७

काणकोण : ५४.९

फोंडा : ४९.६

पणजी : ४५.३

मुरगाव २८.७

दाबोळी २२.४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT