Rice Farming Pudhari
गोवा

Goa Farming | "पाऊस ओसरला, गोव्याचा शेतकरी धास्तावला!; काही भागात भात लावणी पूर्ण, तर कुठे अजूनही पावसाची प्रतीक्षा"

Goa Farming | राज्यात शेतीच्या कामांना सुरुवात ; पावसाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील बहुतांश भागात पाऊस ओसरला आहे. पावसाचा जोर ओसरल्याने शेतकरी धास्तावला आहे. मागच्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडल्याने पावसाचा जोर असाच राहील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली खरी; पण पावसाने दडी मारल्याने शेतकरी धास्तावला असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या मते, मागील चार दिवस हवामान मुख्यतः कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहिले आहे. काही शेतांमध्ये भात लावणी पूर्ण झाली असली, तरी काही ठिकाणी रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. एरवी जुलै महिना मुसळधारेचा असतो. यावर्षी मात्र पाऊस काही दिवस गायब झाला आहे.

तिळारी धरण निम्मेच भरले

गोव्याला पाणीपुरवठा करणारे तिळारी धरण यावर्षी निम्मेच भरले आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ७.३० वा. धरणात ५१.६८ टक्के पाणी आहे. मागच्यावर्षी याच दिवशी धरणात ६५ टक्के पाणीसाठा होता.दरम्यान, गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात केवळ ७.६ मिमी पाऊस पडला, तर यावर्षी एकूण पावसाळ्याचा विचार करता ११६५.४ मिमी पाऊस पडला.

तिळारी हा गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त धरण प्रकल्प आहे. यातून गोव्याला पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. पुन्हा काही दिवस कोसळल्यावर पावसाने दडी मारली आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT