lemon price hike  pudhari photo
गोवा

Panaji Lemon Prices Hike | उन्हामुळे घशाला कोरड; लिंबू, शहाळी महाग

Panaji Lemon Prices Hike | पणजी बाजारातील स्थिती; भाज्यांच्या दरात चढ-उतार कायम

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने उन्हाळा वाढला आहे. पावसाअभावी उकाड्याची तीव्रता वाढल्याने अद्याप कायम असताना शीत पेयांची मागणी वाढली आहे. लिंबू सरबत, लिंबू सोडा, शहाळी यांची मागणी वाढली आहे.

कलिंगडाचा हंगाम आता ओसरला आहे, त्यामुळे थंडाव्यासाठी लोक लिंबू, सगळ्यांवर अवलंबून असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांदा, बटाटा, टोमॅटो यांचे दर स्थिर आहेत. तर वालपापडीचा दर उतरला आहे.

भाज्यांच्या दरांमध्ये चढ उतार मात्र कायम आहेत. सध्या बाजारात लहान आकाराचे लिंबू प्रत्येकी सुमारे ५ रुपयांना, मध्यम आकाराचे ७ रुपयांना तर मोठे लिंबू १० रुपयांपर्यंत विकले जात आहेत.

उन्हाळ्यात सरबत, शीतपेये आणि घरगुती वापरासाठी लिंबांची मागणी कायम असल्याने त्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, बाजारात लिंबांचा पुरवठा पूर्वीच्या तुलनेत कमी होत असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहाळ्यांच्याही दरातही वाढ झाली आहे. सध्या एका शहाळ्यासाठी ५० ते ७० रु. मोजावे लागत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT