Goa Marathi Sammelan 
गोवा

Goa Marathi Sammelan | गोव्यातील मातीची कविता लिहा; त्यातून सुगंध दरवळेल 'कवी महेश केळुसकर'

Goa Marathi Sammelan | कवी महेश केळुसकर : मांडवी तीरावर काव्य जल्लोषचे उद्घाटन; कविसंमेलनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कविता व्यक्तीला ओळसा देते. गोव्यात कवितेसाठी अनेक विषय आहेत. गोमंतकीयांनी गोव्याच्या मातीची कविता लिहावी. यातून परिपूर्ण कविता पडण्यासोबतच तिला गोमंतकीय मातीचा सुगंध येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी महेश केळुसकर यांनी केले. पणजी येथे आयोजित शोध मराठी मनाचा २१ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये कला अकादमीच्या कृष्ण कक्षात शनिवारी आयोजित मांडविच्या तिरावर काव्य जल्लोषचे उद्घाटन प्रसंगी केळुस्कर बोलत होते.

यावेळी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परव, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, जागतिक मराठी अकादमीचे कार्यकारणी सदस्य डॉ. अशोक पाटील व काव्य जल्लोष च्या संयोजिका कवयित्री कालिका बापट उपस्थित होत्या, तर प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे आदी कजी उपस्थित होते.

केळुस्कर म्हणाले की, १९७८ साली आपण गोव्यात पहिली कविता सादर केली होती. त्याला ४० वर्षे झाली. आपण गोव्यात वारंवार येती. गोव्यात कवितेसाठी अनेक विषय आहेत, गोव्यातील रसिक चांगली दाद देतात, कविता व्यक्तीला अओळख देते. तसेच मलाही कवितेने ओळख दिली गोव्याचे बाकीबाब बोरकर यांचा सहवास आपल्याला लाभला आणि आपली कविता प्रगल्भ झाली. कविनी स्वतः कवी असल्याचे सांगत फिरु नये तर वाचकांनी व रसिकांची दाद ही महत्वाची ठरते.

भारतीय कवितेला मोठी परंपरा असून गोव्याची कविताही त्या परंपरेतील आहे. युवकांनी बाकिलाच मोरकर, शंकर रामाणी या सारख्या घोर कवीची परंपरा अभ्यासावी, असे म्हणून केळुस्कर यांनी आपली एक मालवणी कविता सादर केली. दशरथ परब म्हणाले, मांडवी किनारी होणारा कवितांचा जल्लोष मांडवीतून अरवी समुद्राला पोचेल व तेथून तो जगभर पसरेल.

मराठी कविर्तामध्ये गोव्याचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. डॉ. अशोक पाटील यांनी गोळ्यात मराठी संमेलनाची चांगली सुरुवात झाल्याचे मान्यवर साहित्यिकांचा आणि युवकांचा मोठा सहभाग लाभल्यामुळे हे संमेलन यशस्वी होत असल्याचे सांगितले. प्राचार्य अनिल सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की सलग दोन दिवस चालणाऱ्या काव्य जल्लोष तथा कवी संमेलनामुळे एक वेगळाच आयाम या संमेलनाला प्राप्त होणार आहे.

अनेक वर्षे आठवणीत राहणारे असे हे बराती जागतिक मराठी संमेलन होणार असल्याचे ते म्हणाले. उद्‌घाटन सत्रानंतर केळस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कवी संमेलन झाले. दिवसभर ४ सत्रात चार काव्य संमेलने झाली. त्या सत्रांचे अध्यक्षपद उदय ताम्हणकर, मेघना कुरुंदवाडकर, डॉ. विनायक बापट व माधव सटवानी यांनी केले. रविवारी ११ रोजी सकाळी ९.३० वाजता रमेश बंसकर यांच्या अध्यक्षतेखाली बाल कविता संमेलन होईल व त्यानंतर आणखी एक सत्र होईल. सर्व सत्रामध्ये मिळून गोव्यातील सुमारे १५० कवी सहभागी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT