बार्देश तालुक्यात दोन स्वतंत्र कारवाईत गोवा पोलिसांनी तब्बल 31 लाखांचा गांजा जप्त केला.
म्हापसा बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये छापा टाकताना उमर कच्ची (25) अटक; त्याच्याकडून 20 ग्रॅम एक्स्टसी ड्रग्ज जप्त.
कच्ची हा काणका–वेर्ला येथे राहत असून अनेक वर्षे गोव्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल; पुढील तपास PSI पी. चोपडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
बार्देश तालुक्यात म्हापसा व कळंगुट येथे करण्यात आलेल्या दोन कारवाईत तब्बल ३१ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. म्हापसा बसस्थानकावर २० लाखांचा तर कळंगुट येथे ११ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत म्हापसा पोलिसांनी काल (९ डिसेंबर) रात्री ९ च्या सुमारास नव्या कदंब बसस्थानकाच्या पार्किंग जागेत छापा टाकून उमर कच्ची (२५) याला अटक करून त्याच्याकडून २० ग्रॅम एक्स्टसी ड्रग्ज जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित कच्ची हा काणका वेर्ला येथे राहत असून अनेक वर्षे तो गोव्यात आहे.
पोलिस खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. संशयित या ड्रग्जची विक्री करण्यासाठी टाटा सफारी हे चारचाकी वाहन घेऊन आला होता. पोलिसांनी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्याला पोलिस कोठडी घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पी. चोपडेकर करत आहेत.