सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
मनोरा राय परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या भागात प्रस्तावित असलेल्या गृहप्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे पाणी आणि वीज पुरवठ्यासारख्या पायाभूत सुविधांवर अधिक ताण येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
गुरूवारी राय ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्तावित गृहसंकुलाच्या जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी सरपंच झेवियर फर्नांडिस, पंच सदस्य जुडास क्वाड्रोस आणि पंचायत सचिव उपस्थित होते. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी पंचायत प्रतिनिधींसमोर आपली ूमिका मांडली आणि हा प्रकल्प पुढे जाऊ देऊ नये, अशी विनंती केली.
त्यांनी स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येकडे पंचायतीचे लक्ष वेधले. तसेच, पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास ही समस्या अधिक गंभीर होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.