Goa Mankurad Mango 
गोवा

Goa Mankurad Mango | फळांचा राजा 'मानकुराद' म्हापसा बाजारात दाखल! एका आंब्याची किंमत 450 रुपये!

Goa Mankurad Mango | फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या 'मानकुराद' आंब्याचे सध्या म्हापसा बाजारात आगमन झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या 'मानकुराद' आंब्याचे सध्या म्हापसा बाजारात आगमन झाले आहे. आंब्याच्या हंगामाला अद्याप सुरुवात व्हायची असतानाच हंगामाच्या प्रारंभी या आंब्याला चढे दर मिळत असल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

सध्या या आंब्याचा दर सुमारे ५ हजार रुपये डझन इतका आहे. त्यानुसार एका आंब्याची किंमत सुमारे ४०० ते ४५० रुपये इतकी होत आहे. त्यामुळे ग्राहक सध्या केवळ चौकशी करून किंवा आंबे पाहूनच पुढे जात असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.

चवीला अत्यंत गोड आणि दर्जेदार असलेल्या या आंब्याला नेहमीच मोठी मागणी असते. मात्र सध्या असलेले दर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे नसल्याने दर कमी होण्याची प्रतीक्षा अनेकजण करत आहेत. दरम्यान, हवामानामुळे यंदा आंब्याला मोहोर कमी प्रमाणात लागल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT