पणजी: राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. गोव्यासोबत देशातील अनेक राज्यातही थंडीचा कडाका पसरला आहे. राजधानीत पणजी येथे शुक्रवारी व शनिवारी १५ वर्षातील सर्वात कमी तापमान १७.५ अंश डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी), पणजीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पंधरा वर्षांत एवढ्या खाली पणजीचा पारा तापमान कधी १७.५ अंश घसरले नव्हते. डिग्री सेल्सिअसवर शनिवारी १७.६ शुक्रवारी ते १७.५, तर अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पूर्वेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात तापमान खाली येत आहे.
गुरुवारी पणजी हवामान केंद्राने किसान तापमान १८.८ अंश डिग्री सेल्सिअस नोंदवले, तर शुक्रवारी ते १७.५ अंश सेल्सिअस नोंद झाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सामान्य तापमान २१ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. पुढील २४ तासांत तापमान ३४ ते १८ दरम्यान राहील आणि पुढील ४८ तासांत तापमान ३४ ते १९ अंश सेल्सिअस राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.