Goa Legislative Assembly adjourned
गोवा विधानसभेचे कामकाज तहकूब File Photo
गोवा

Goa Assembly Monsoon Session : विधानसभेचे कामकाज तहकूब

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

लक्षवेधी सूचनेवेळी सत्ताधारी व विरोधकांना समान संधी मिळत नसल्याचा दावा करुन विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांच्या आसना समोर धाव घेतल्याने सभापती तवडकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे अगोदरच तहकूब केले.

दोन्ही लक्षवेधी सूचना सत्ताधारी पक्षाच्या मांडण्यास दिल्या जातात. एक विरोधी पक्षाला द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. सभापती तवडकर यांनी उद्यापासून तसे करु. ८ ऑगस्ट पर्यंत विधानसभा अधिवेशन आहे. काहीवेळा विरोधकांच्या दोन लक्षवेधी सूचना येतील. असे सभापतींनी सांगून पाहिले मात्र विरोधी सात आमदार युरी आलेमाव, विजय सरदेसाई, ॲडव्होकेट कार्लूस फेरेरा, एल्टन डिकोस्टा, व्हेन्सीवियेगस. क्रुझ सिल्वा व विरेश बोरकर हे सभापतींच्या समोरुन हलले नाहीत. त्यामुळे सभापती तवडकर यांनी जेवणासाठी कामकाज दहा मिनिटे आधीच तहकूब केले.

SCROLL FOR NEXT