गोवा राज्यातील एलईडी सिंधुदुर्गात नौका ताब्यात 
गोवा

Sindhudurg Fishery Department | सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची मोठी कारवाई! निवती समुद्रात गोव्याची 'एलईडी' मासेमारी नौका जप्त

Sindhudurg Fishery Department | सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने निवती समुद्रात अवैध एलईडी मासेमारीचे साहित्य असलेली गोवा राज्यातील नौका ताब्यात घेतली.

पुढारी वृत्तसेवा

मालवण : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने निवती समुद्रात अवैध एलईडी मासेमारीचे साहित्य असलेली गोवा राज्यातील नौका ताब्यात घेतली. नौकेवर नौका तांडेलसह २० खलाशी असून सदर नौका जप्त करून पुढील कारवाईसाठी सर्जेकोट बंदरात आणली आहे.

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार ४ एप्रिल रोजी पहाटे ३.४५ वा. च्या सुमारास निवती समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहा. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर हे नियमित गस्त घालत होते.

यावेळी गोवा राज्यातील पल्लवी साईहर्षद धोंड (रा. पणजी गोवा) यांची नौका जय बॉस ही राज्याच्या जलधीक्षेत्रात मासेमारी करताना निदर्शनास आली. पाठलाग करून नौकेची तपासणी केली असता नौकेवर कोणतीही विधीग्राह्य कागदपत्रे आढळली नाहीत. तसेच नौकेवर एलईडी मासेमारीचे अवैध साहित्य आढळले. या नौकेवर नौका तांडेलसह इतर २० खलाशी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT