Goa Liquor Seizure 
गोवा

Goa Liquor Seizure | लाकडाच्या भुशाच्या गोण्यांखाली लपवला लाखोंचा मद्यसाठा; गोव्यात मोठी कारवाई

Goa Liquor Seizure | गोव्यातून बेकायदेशीररीत्या मद्याची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रकवर गोवा अबकारी विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई केली.

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातून बेकायदेशीररीत्या मद्याची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रकवर गोवा अबकारी विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई केली. पत्रादेवी येथील अबकारी तपासणी नाक्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ३२ लाख ४० हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.

विशेष म्हणजे, हा मद्यसाठा लाकडाच्या भुशाच्या गोण्यांखाली लपवून ठेवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता पत्रादेवी अबकारी तपासणी नाक्यावरून जाणाऱ्या एका ट्रकला अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवले.

राजस्थान राज्यातील आरजे-११-जीडी-४०५२ या नोंदणी क्रमांकाच्या ट्रकची कसून तपासणी केली असता, लाकडाच्या भुशाच्या गोण्यांखाली लपवून ठेवलेल्या गोवा व्हिस्कीच्या तब्बल ५०० पेट्या आढळून आल्या. या मद्यसाठ्याची किंमत ३२ लाख ४० हजार रुपये असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले. मद्याची वाहतूक लपवण्यासाठी लाकडाच्या भुशाच्या गोण्यांचा वापर करण्यात आल्याचे तपासणीत उघड झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT