गोवा

Goa illegal construction controversy | बेकायदेशीर बांधकामे; जैवविविधता समितीचे दुर्लक्ष

कोरगाव ग्रामसभेत नागरिकांचा आरोप; विविध विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर

पुढारी वृत्तसेवा

कोरगाव : कोरगाव ग्रामसभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यात मेगा प्रकल्पांना विरोध, कचरा समस्या, बिगर गोमंतकीयांकडून होणारी बेकायदेशीर बांधकामे आदी विषयांवरही चर्चा करून विविध ठराव मंजूर करण्यात आले. कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचा मुद्दाही ग्रामसमेत उपस्थित करण्यात आला. यामुळे जंगलांचा न्हास होत असून पशुपक्षी, नैसर्गिक झरे आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची चिता व्यक्त करण्यात आली.

जैवविविधता समिती याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. सरपंच देविदास नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेच्या व्यासपीठावर पंचायत सदस्य समिल भाटलेकर, अब्दुल करिम यासीन नाईक, दिवाकर जाधव, नीता नर्से, कल्पिता कलशावकर, पंच अनुराधा कोरगावकर, उमेश च्वारी तसेच पंचायत सचिव अविनाश पाळणी उपस्थित होते. निरीक्षक म्हणून देवानंद गावडे यांनी उपस्थिती दर्शविली.

पेडणे ते कोरगाव हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता वाढली होती. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नव्हता, मात्र, आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. देवानंद गावडे, सुदीप कोरगावकर, पंच दिवाकर जाधव, सरपंच तसेच अन्य ग्रामस्थांनी आमदारांचे अभिनंदन केले.

सध्या पंचायत सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, इमारतीतील जुन्या वस्तू संबंधित पंचांनी विकल्याचा आरोप स्थानिक नरेश कोरगावकर यांनी केला. यासंदर्भात पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केला. यावर सरपंचांनी, असा प्रकार आढळल्यास योग्य कारवाई करण्यात येईल व विषय पुढे नेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

मागील ग्रामसमेत बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर झाला होता. त्याबाबत पुढे काय कार्यवाही झाली, असा प्रश्न राहुल भगत यांनी उपस्थित केला. यावर सरपंचांनी संबंधित विषयावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

कोरगाव परिसरातील काही भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याने त्यावरही चर्चा झाली. आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे हा प्रश्न मांडण्यात आला असून तो लवकरच सोडविण्यात येईल, अशी माहिती सरपंचांनी दिली. कोरगाव परिसरात रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली.

पंचायतने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पाहणी करून सार्वजनिक ठिकाणी कचरा करून टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुदीप कोरगावकर आणि अन्य ग्रामस्थांनी केली. या ग्रामसमेत सुदीप कोरगावकर, पंढरीनाथ आरोलकर, नरेश कोरगावकर, रोहिदास माठलेकर, विकास गावडे, देवानंद गावडे, प्रकाश तळावणेकर, महादेव गवंडी, राहुल भगत आदींनी सहभाग घेतला.

ग्रामसभेच्या शेवटी सरपंच देविदास नागवेकर यांनी उपस्थितांचे ग्रामसभेच्या शेवटी सरपंच देविदास नागवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भालखाजन-कोरगाव भागात खारट पाणीपुरवठा

पावसाळ्यापूर्वी पंचायत क्षेत्रातील नालेसफाई, सत्यांच्या कडेला वाढलेली झाडे हटविणे तसेच अन्य आवश्यक कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मालखाजन- कोरगाव भागात नागरिकांना खारट पाणीपुरवठा होत असल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ग्रामसमेत उपस्थित करण्यात आला. अनेक ग्रामसभांमध्ये चर्चा होऊनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने त्वरित तो मार्गी लावावा, अशी मागणी विकास गावडे यांनी केली. तसेच पंचायतने इतर प्रलंबित कामांकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT