Health Minister Vishwajit Rane File Photo
गोवा

Goa Cancer Hospital | नवीन कर्करोग रुग्णालयामुळे 500 नोकऱ्यांची निर्मिती : मंत्री राणे

Goa Cancer Hospital | नवीन कर्करोग रुग्णालयामुळे ५०० परिचारिकांच्या नोकऱ्या निर्माण होतील, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

नवीन कर्करोग रुग्णालयामुळे ५०० परिचारिकांच्या नोकऱ्या निर्माण होतील, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला आहे. विश्वजित राणे ते म्हणाले की, दुय्यम नर्सिंग कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रणालीमध्ये समाकलित करण्यासाठी राज्य सरकार लवकरच निविदा काढणार आहे.

या निर्णयामागे एकसंध काळजी पथक तयार करणे आणि रुग्णांचे एकूण व्यवस्थापन सुधारणे हा उद्देश आहे. नवे कॅन्सर इस्पितळ तयार झाले आहे तेथे ५०० च्या आसपास परिचारिकांची गरज भासणार आहे. आता, मी एक अशी निविदा आणत आहे, ज्यामध्ये परिचारिकांसाठी दुसऱ्या स्तराचाही समावेश आहे, जेणेकरून परिचारिकांच्या मदतीसाठी आरोग्य प्रणालीशी एकात्मिक व्यवस्था असेल, असेही राणे म्हणाले.

30 खाटांचे एनआयसीयू 15 दिवसांत

आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ३० खाटांच्या नवजात अतिदक्षता विभागाचे (एनआयसीयू) चे उद्घाटन केले. या सुविधेमुळे अपरिपक्व आणि गंभीर आजारी नवजात बालकांना मिळणाऱ्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवेला बळकटी मिळेल. हा विभाग येत्या १५ दिवसांत कार्यन्वीत होईल, अशी माहिती राणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT