CM Pramod Sawant 
गोवा

CM Pramod Sawant | "गरजू रुग्णांना मिळणार घरपोच आरोग्यसेवा!आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून 'स्टेट केअर' उपक्रमाची घोषणा"

CM Pramod Sawant | राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने १८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने १८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. राज्यातील सर्व आयटीआय आयएसओ प्रमाणित असून अशी कामगिरी करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कला अकादमीत बुधवारी आयोजित जागतिक कौशल्य दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे प्रमुख न्यायमूर्ती अभय सप्रे, कौशल्य विकास खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, धेंपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत, सांख्यिकी व नियोजन खात्याचे संचालक विजय सक्सेना आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजनेचा आतापर्यंत सुमारे २१ हजार युवकांनी लाभ घेतला आहे. कौशल्याधारित शिक्षण हे आजच्या काळाची गरज असून, कौशल्याशिवाय यश मिळविणे कठीण आहे.

त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवोपक्रम आणि संशोधनासाठी प्रोत्साहित करावे. योग्य प्रशिक्षण मिळाल्यास गोवेकर युवक कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारने कौशल्य विकासासाठी अनेक शैक्षणिक संस्था व उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात येत असल्याचे नमूद केले. त्यामुळे आयटीआय विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम, व्यावसायिक शिक्षण तसेच सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

त्या कर्मचाऱ्यांना कायम करणार

कौशल्य विकास खात्यांतर्गत दहा वर्षांहून अधिक काळ कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या आयटीआय कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दालनांची केली पाहणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमी परिसरात कौशल्य प्रशिक्षणातून तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांच्या दालनांना भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे त्यांनी कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT