गोवा

Goa Maza Flat Scheme | 'माझा फ्लॅट' तक्रार निवारणासाठी देणार 'सहारा'

Goa Maza Flat Scheme | आमदार दाजी साळकर : सनदी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली यंत्रणा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

'माझे घर' योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यातील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने 'माझा फ्लॅट' योजना जाहीर केली असून, या योजनेचे अर्ज लवकरच उपलब्ध होणार आहेत.

योजनेची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, तिची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी सनदी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली 'सहारा' ही यंत्रणा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते आमदार दाजी साळकर यांनी दिली.

पत्रकार परिषदेला भाजपचे प्रवक्ते अमोघ आर्लेकर आणि रमेश घाडी उपस्थित होते. दाजी साळकर म्हणाले की, केवळ योजना जाहीर करून न थांबता तिची प्रभावी अंमलबजावणी करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर्वसामान्यांना प्रत्यक्ष दिलासा देत आहेत. ३०-४० वर्षांपूर्वी अनेकांनी साध्या कागदावर व्यवहार करून फ्लॅट खरेदी केले आणि त्यात वास्तव्यास गेले.

मात्र, आज त्या इमारती जुन्या झाल्याने त्यांचे पुनर्बाधकाम करायचे झाल्यास जागेच्या मालकीचे प्रश्न, फ्लॅटची कायदेशीर नोंद नसणे, जमिनीच्या मालकीबाबतचे वाद तसेच इतर कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे अनेक फ्लॅटधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढून फ्लॅटधारकांना कायदेशीर मालकी हक्क मिळवून देण्यासाठीच 'माझा फ्लॅट' योजना आणण्यात आल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT