Goa CM Pramod Sawant 
गोवा

Goa Government Health Scheme | लवकरच गंभीर आजारावर 100 रुपयांत आरोग्य तपासण्या

Goa Government Health Scheme | मुख्यमंत्री : गोवा सुविद्य आणि स्वानंदी होण्यासासाठी प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा सरकार व अंजनी माशेलकर फाउंडेशनतर्फे येत्या काळात १०० रुपयांत असाध्य अशा १० रोगांच्या तपासण्या उपलब्ध केल्या जातील. गोवा सरकार त्यावर संशोधन करत आहे. गोवा सुविद्य आणि स्वानंदी राहावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून संशोधनावर सरकारने नेहमीच भर दिलेला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना गोमंत गौरव सन्मान पुरस्कार प्रदान केल्यानंतर डॉ. सावंत बोलत होते. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित कला अकादमीत गुरुवारी आयोजित या कार्यक्रमाला डॉ. माशेलकर यांच्यासोबत वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, गोवा चेंबरच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड, उपाध्यक्ष यतीन काकोडकर,

संतोष अमोणकर, वल्डपीस युनिव्हर्सिटी चे संचालक राहुल कराड, प्राध्यापक वाल्टर फीली, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण गोव्यात उपलब्ध होणार असून यंदापासून ते सुरू होईल. कराड यांच्या या विद्यापीठाला सरकारने मान्यता दिलेली असून सुसंस्कृत व सूचित गोवा करण्याचे सरकारने अनेक प्रयत्न सुरू केल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT