Goa CM Pramod Sawant 
गोवा

Goa Highway Waste Management | कचरा जमा करण्यासाठी नवी एजन्सी नेमणार

Goa Highway Waste Management | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सभागृहात माहिती : पूर्वीचे कंत्राट रद्द

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील हमरस्त्याच्या बाजूचा कचरा उचलण्यासाठी कर्नाटकातील एका एजन्सीला कंत्राट दिले होते, मात्र त्यांनी चांगले काम केले नाही. त्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द केले. आता नवीन एजन्सी निवडली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. बुधवारी शून्य प्रहराला आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

कर्नाटकाची एजन्सी नेमून तिला १३ कोटी ७५ लाख रुपये दिले गेले. जर ती एजन्सी चांगले काम करत नव्हती तर तिला चार वर्षे का ठेवले, असा प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यानी वरील माहिती देत ती एजन्सी चांगले काम करत नसल्याने चार वर्षांचे पैसे देऊन तिला बंद केल्याचे सांगितले. आमदार नीलेश काब्राल यांनी कुडचडेची जुनी मार्केट इमारत धोकादायक झाल्याचे सांगून लोकांच्या जीवाला धोका असल्याने नवीन इमारत बांधण्याची मागणी केली.

माजी सैनिकांची बिले द्या : साळकर

माजी सैनिकांनी खासगी इस्पितळात उपचार घेतल्यानंतर त्याची बिले दिली गेली नसल्याने खासगी इस्पितळे माजी सैनिकांवर उपचार करण्यास नकार देत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याबाबत केंद्रीय संरक्षणमंत्र्यांशी पुन्हा बोलावे, अशी मागणी आमदार दाजी साळकर यांनी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की हल्लीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गोव्यात आल्यानंतर त्याची भेट घेऊन आपण ही बाब त्यांना निवेदन देऊन लक्षात आणून दिली होती. त्यानंतर अर्धी रक्कम दिली गेली उर्वरित रक्कम द्यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT