Goa FDA Raid Verna Industrial  
गोवा

Goa FDA Raid Verna Industrial | दक्षिण गोव्यात एफडीएची धडक कारवाई

Goa FDA Raid Verna Industrial | विनापरवाना व्यवसायांसह अन्नसुरक्षा त्रुटी: सहा व्यावसायिकांकडून दंड वसूल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने नागोवा, वेर्णा औद्योगिक वसाहत सासष्टी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान रेस्टॉरंट, किरकोळ विक्रेते आणि फेरीवाले अशा एकूण १२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन आस्थापने आवश्यक एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणीशिवाय व्यवसाय करत असल्याचे आढळून आले.

संबंधित व्यावसायिकांना बिनापरवाना व्यवसायाबाबत नोटिसा बजावून तातडीने परवाना अथवा नोंदणी घेण्याचे निर्देश देण्यात आले. या पथकाचे नेतृत्व नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर यांनी केले. त्यांच्यासमवेत वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अमरदीप गावडे प्रियोळकर सहभागी होते.

तपासणीदरम्यान आठ आस्थापनांमध्ये अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, कीटकांचा प्रादुर्भाव, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी योग्य गणवेश व संरक्षणात्मक पोशाख न परिधान करणे, कर्मचाऱ्यांची स्वच्छता प्रमाणपत्रे उपलब्ध नसणे, स्वयंपाकासाठी कृत्रिम खाद्य रंगांचा वापर तसेच कचरा व्यवस्थापनाच्या अपुऱ्या सुविधा अशा विविध त्रुटी निदर्शनास आल्या.

संबंधित अन्न व्यवसायिकांना या सर्व त्रुटी आठ दिवसांच्या आत दूर करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम (कोटपा) अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा अन्न व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १,२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय, संचालकालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे फातोर्डा, सासष्टी येथील एका डुकराच्या मांस प्रक्रिया (पोर्क प्रोसेसिंग) युनिटची तपासणी करण्यात आली. या युनिटकडूनही एफएसएसएआय परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित व्यावसायिकास बिनापरवाना नोटीस बजावून तातडीने आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT