Allegation of 40 percent commission in Goa events Vireato Fernandes
पणजी : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी देशवासीयांच्या खर्चावर निर्बंध घालतात आणि गोव्यात मुख्यमंत्री आणि मंत्री वेगवेगळ्या इव्हेंटवर कोट्यवधी रुपये उधळतात। फिल्म फेस्टिव्हलमधील ४० टक्के कुणाच्या खिशात जातात. दरवर्षी काजू फेस्टिव्हल, समर फेस्टिव्हल करता त्यातील टक्केवारी कुणाच्या खिशात जाते, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे राज्यातील भाजपने पहिले पैसे खाणे बंद करावे, असे आवाहन काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते.
फर्नांडिस म्हणाले, पंतप्रधान इतरांना सल्ला देतात आणि आपण विदेश दौरे करतात. त्यावर कोट्यवधी रुपये सर्वसामान्याचे खर्च होतात. पंतप्रधान अमेरिकेला का शरण जातात, त्याची काय कारणे आहेत. एपस्टिन फाईलमध्ये असे काय आहे, ज्याची पंतप्रधानांना भीती वाटते, असे सांगून फर्नांडिस म्हणाले, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत गोवा स्वयंपूर्ण करण्याची घोषणा करतात. त्यासाठी सर्वांना कामाला लावतात.
एक एक गाव स्वयंपूर्ण करणार म्हणतात. त्याचे काय झाले? असा प्रश्न विचारून फर्नांडिस म्हणाले की, जेव्हा सरकार अपयशी ठरते तेव्हा ते लोकांना हिंदू मुस्लिम, ख्रिश्चन यांच्या वादात अडकवले जाते. त्यामुळे आता गोवेकरांनी भाजपपासून सावध राहण्याची गरज आहे.
फर्नाडिस म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकांची भीती घालवण्यासाठी चर्चेची मागणी केली होती. त्यावेळी चर्चेस नकार दिला. मात्र, आता निवडणुका झाल्याने लोकांवर अनेक निर्बंध घातले आहेत, असेही ते म्हणाले.