मडगाव; पुढारी वृत्तसेवा
भाजपचे उपमुख्यमंत्री राहिलेले बाबू कवळेकर यांचा केपेतील गड ढासळत चालला आहे. सांगेत मात्र त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांची ट्रेन सुसाट वेगात धावत आहे. बाबू २८०० मतांनी पिछाडीवर तर सावित्री कवळेकर तीनशे मातांनी आघाडीवर आहेत.
बाबू यांना काँग्रेसचे एल्टन डिकॉस्ता जबरदस्त धक्का देत आहेत. सध्या चौथ्या फेरीची मतमोजणी सुरू असून बाबू पुन्हा पुन्हा पिछाडीवर पडत असल्याचे दिसून येत आहेत. एल्टन यांनी आता पर्यंत झालेल्या मतमोजणीत बरीच आघाडी घेतली असून त्यांचा विजय जवळपास झाल्याचे स्पष्ट होत आहे. सांगेत मात्र सावित्री कवळेकर यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे सुभाष फळदेसाई पिछाडीवर आहेत. या दोघांमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे.
हेही वाचा