गोवा

Goa Election : काँग्रेसने दिले सर्वाधिक नवे उमेदवार

backup backup

म्हापसा ः पुढारी वृत्तसेवा काँग्रेसकडे दूरद़ृष्टी आणि अनुभव असल्याचे सांगत खासदार डॉ. शशी थरुर म्हणाले की, आम्ही सर्वाधिक नवीन चेहरे व दोन अनुभवी विद्यमान आमदार यंदाच्या गोव्याच्या विधानसभेसाठी दिले आहेत. जे गोव्याच्या राजकीय जीवनात ताजी हवा आणण्यास सक्षम आहेत. ते म्हापसा काँग्रेस गट समितीने खोर्ली-म्हापसा येथे आयोजिलेल्या संवादात्मक सत्रात बोलत होते.म्हापसा गट काँग्रेस समितीने आयोजिलेल्या शाश्वत स्मार्ट सिटी आणि म्हापशाची क्षमता या विषयावर एक संवादात्मक सत्र आयोजित केले होते. ज्यात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शशी थरूर तसेच माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, जिल्हाध्यक्ष विजय भिके, गटाध्यक्ष अ‍ॅड. शशांक नार्वेकर हे व्यासपीठावर हजर होते.  (Goa Election)

आम्हाला अभिमान आहे की, सात वर्षांमध्ये आम्ही 12 टक्के विकास दर व्यवस्थापित केला आणि गोव्याला देशातील सर्वोत्कृष्ट छोटे राज्य बनवल्याबद्दल विविध राष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. मागील नऊ वर्षांच्या भाजपच्या राजवटीत पाहिले की, गोव्याचे प्रशासन मागे पडले. तसेच भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे, अर्थव्यवस्थेची कुंचबणा, पर्यावरणाला धोका तसेच पर्रीकर आजारी पडल्यानंतर प्रशासनातील अक्षमता यातून स्पष्ट होते की, भाजपला सत्तेत आणण्यासाठी आणखी एक संधी देण्याची आवश्यकता नाही, असेही थरुर म्हणाले. 2017 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष होता आणि आता आम्ही दोन आमदारांवर येऊन पोहचलो. त्याचे आत्मरीक्षण पक्षाने केले असल्याचेही थरूर म्हणाले. (Goa Election)

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT