Goa Drug Seizure 
गोवा

Goa Drug Seizure 67kg- राज्यात सहा महिन्यांत 67 किलो ड्रग्ज जप्त

किंमत 4 कोटी : गोवा पोलिसांकडून 115 जणांना अटक; अटक केलेल्यांमध्ये 36 गोमंतकीय, 63 बिगर गोमंतकीय

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोवा पोलिसांनी या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे ४ कोटी रुपये किमतीचे ६७ किलो अमलीपदार्थ जप्त केले आणि ११५ जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये ३६ गोमंतकीय, ६३ बिगर गोमंतकीय आणि १६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेले परदेशी नागरिक नायजेरिया, गिनी, अमेरिका, इसावल, ग्रीस, फ्रान्स आणि नेपाळचे होते. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये गांजा, चरस, कोकेन, एलएसडी, एमडीएमर, एक्स्टसी, मेथाम्फेटामाइन, केटामाइन, हायड्रो वीड, गांजाची रोपे व बिया, हशीश तेल, मंत्रिक मशरूम आणि हेरॉईन यांचा समावेश होता.

या कालावधीत पोलिसांनी २१ छापे टाकले, ज्यामध्ये अमलीपदार्थ विरोधी पथक (एएनली), गुन्हे शाखा, कळंगुट पोलिस स्थानक आणि काणकोण पोलिस स्थानकाने सर्वाधिक कारवाया केल्या दरम्यान, पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी अटक करण्यात आलेल्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ पुरदजान्या पुरवठादारांना ओळखून अटक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विशेष पहिल्या अटकेनंतर तपास संपता कामा नये, पोलिसांनी संपूर्ण पुरवठा साखळीचा मागोवा घेऊन अमलीपदाथीच्या व्यापाराशी संबंधित साठे गोठवून तस्करी करणाऱ्या नेटवर्कला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे निर्देश पोलिस महासंचालकांनी दिले. पोलिसांनी शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात कार्यरत असलेल्या अमलीपदार्थाच्या तस्करांची यादीही तयार केली असून, त्यांना अटक करण्याची योजना आहे. राज्यभरातील अमलीपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईचा आढावा देण्यासाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहेत.

व्यवसायातील सूत्रधार, मोठे विक्रेते आणि वितरकांता लक्ष्य करतील, तसेच डार्क वेब, सोशल मीडिया, क्रिप्टोकरन्सी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या गैरवापरद्वारे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीवरही गोवा पोलिस कारवाई करतील.

नवीन कर्मचाऱ्यांच्या साह्याने अमलीपदार्थ विरोधी कारवाया अधिक बळकट करण्यासाठी अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या (एएनसी) गुप्तचर यंत्रणेचीही पुनर्रचना करण्यात आली असून, २७ कर्मचायांची बदली करण्यात आली आहे. या युनिटमध्ये चार वर्षपिक्षा जास्त काळ सेवा केलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आमनी, ज्यामुळे एएनसीच्या सुमारे ४७ टक्के मनुष्यबळावर परिणाम झाला आहे.

अशी केली ड्रग्ज जप्तीची कारवाई -

कालावधी - जानेवारी ते जून २०२६ वेगवेगळ्या ठिकाणी

२१ छापे

६७ किलो ड्रग्ज जप्त

किंमत अंदाजे ४ कोटी

११५ जणांना अटक

अटक केलेल्यांमध्ये ३६ गोमंतकीय

६३ बिगर गोमंतकीय

१६ परदेशी नागरिक

२०२५ मध्ये २३३ किलो ड्रग्ज जप्त, २०६ जणांना अटक

२०२७ मध्ये, गोया पोलिसांनी २३३ किलो अमलीपदार्थ जप्त केले आणि २०६ जणांना अटक केली, ज्यात ७र गोमंतकीय, १०२ बिगर गोमंतकीय आणि ३२ परदेशी नागरिकांचा समावेश होता. २०२४ मध्ये २७४ किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, २०२५ मधील अमलीपदार्थाच्या जप्तीचे प्रमाण २०२४ च्या तुलनेत जवळपास ७०० टक्क्यांनी वाढले आहे, ज्यामुळे केवळ रस्त्यावरील विक्रेत्यांना अटक करण्याऐवजी संघटित अमलीपदार्थ नेटवर्क उद्‌वस्त करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

जप्त केलेल्या ड्रग्जमध्ये यांचा समावेश

जप्त केलेल्या मालामध्ये गांजा, चरस, कोकेन, एलएसडी, एमडीएमए, एक्स्टसी, मेथाम्फेटामाइन, केटामाइन, हायड्रो वाँड, गांजाची रोपे व बिया, हशीश तेल, मंत्रिक मशरूम आणि हेरॉईन यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT