पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोवा रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाच्या (रेरा) अध्यक्षपदी निवृत प्रशासकीय अधिकारी धर्मेंद्र शर्मा यांची निवड झाल्याची माहिती नगरविकास आणि नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.
गोवा सरकारचे मुख्य सचिव आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून काम केलेल्या निवृत्त अधिकारी शर्मा यांच्या अनुभवाचा या पदासाठी नक्कीच फायदा होईल. त्यांची नियुक्ती हे गोव्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील भागधारकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याच्या दिशेने एक आश्वासक पाऊल आहे. त्याच्या या नव्या नियुक्तीचा गोव्यातील बांधकाम क्षेत्राला फायदा होईल, असे म्हणत मंत्री राणे यांनी शर्मा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.