Dabolim Airport  
गोवा

Dabolim Airport | दाबोळी विमानतळावर आगीचा थरार! शॉर्टसर्किटमुळे गोदामात भडका; प्रवाशांमध्ये मोठी घबराट

Dabolim Airport | कर्मचाऱ्यांचे वेळीच नियंत्रण; काही काळासाठी टर्मिनल बंद

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अरायव्हल गेट २ च्या गोदामात (स्टोअर रूम) शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याच्या घटनेने गोंधळ उडाला. दरम्यान, यामुळे विमानतळावरील सर्व टर्मिनल काही वेळ बंद ठेवण्यात आले.

ही आग विमानतळावरील कामगारांनी वेळीच आटोक्यात आणली. स्टोअर रूममधील विजेचे सर्व सामान खाक झाले. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (दि.११) रोजी सकाळी ११. ३० वा. आगीची ही घटना घडली. आग आटोक्यात आणल्यानंतर काही वेळाने सर्व टर्मिनल सर्वसामान्यांना खुला करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणा मार्फत देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT