Verna Accident Deah Pudhari
गोवा

Verna Accident Deah | दाबोळीत भीषण अपघात; कोल्हापूरच्या तरुणाला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू

Verna Accident Deah | पणजी-मडगाव महामार्गावर थरार; औषध कंपनीत कामावर जाताना तरुणावर काळाचा घाला

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा

पणजी-मडगाव राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रवीण शिरोळकर (सध्या रा बायणा, मूळ रा. शिरोळकर चौक, निगवे दुमाला, ता. करवीर, कोल्हापूर, ३२ वर्षे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील एका औषध कंपनीत कामाला होता.

कामावर जात असतानाच त्याचा अपघाती मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण शिरोळकर आपल्या दुचाकीवरून वेर्णाच्या दिशेने जात होता.

त्याचवेळी एकाच दिशेने एक ट्रक आणि एक टँकर देखील जात होते. दोन अवजड वाहने जात असताना प्रवीणने ओव्हरटेक प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो थेट ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने प्रवीणचा जागीच ठार झाला.

ट्रक चालकाची शरणागती

अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे काहीकाळ महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही वेळाने संबंधित ट्रक चालक स्वतःहून वेर्णा पोलिस स्थानकात शरण आला. पोलिसांनी तातडीने ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रक चालकाची ओळख आणि इतर तपशील अद्याप समोर आले नसून पोलिस तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT