Heart Attack Case | सांताक्रूझमध्ये ग्रामसभेत प्रश्न मांडताना 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू

Heart Attack Case | सांताक्रूझमध्ये प्रश्न मांडताना वृद्धाला हृदयविकाराचा झटका
Heart Attack Case | सांताक्रूझमध्ये ग्रामसभेत प्रश्न मांडताना 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सांताक्रूझ येथे आयोजित ग्रामसभेत प्रश्न मांडताना एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव ओलाव्हिओ फर्नांडिस (वय ७०) असे आहे. या घटनेमुळे ग्रामसभेचे कामकाज बंद करण्यात आले.

Heart Attack Case | सांताक्रूझमध्ये ग्रामसभेत प्रश्न मांडताना 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू
Goa 2036 Olympic Preparation | आतापासूनच करा ऑलिम्पिकची तयारी! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोमंतकीय खेळाडूंना आवाहन

या घटनेमुळे सांताक्रूझ परिसरात शोककळा पसरून ग्रामसभेवरही दुःखाचे सावट पसरले. अर्धा तास उलटला तरी १०८ रुग्णवाहिका न पोहोचल्याने उपस्थित ग्रामस्थांनी आरोग्य खात्याच्या या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला.

ग्रामसभेत फ्लॅट हस्तांतरणाशी संबंधित शुल्काबाबत प्रश्न मांडण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून ओळखले जाणारे, तसेच निवृत्त सरकारी कर्मचारी असलेले ओलाव्हिओ फर्नांडिस उभे राहिले.

आपला प्रश्न मांडत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले. यावेळी उपस्थित आमदार रुडॉल्फ फर्नांडिस व नागरिकांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे त्यांना खासगी वाहनातून गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सांताक्रूझ चर्चसमोरील हायस्कूलमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत पंचायतीने फ्लॅट हस्तांतरणासाठी २५ हजार रुपये शुल्क आकारणी केली जात असल्याने यावर चर्चा सुरू होती.

Heart Attack Case | सांताक्रूझमध्ये ग्रामसभेत प्रश्न मांडताना 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू
Canacona Health Centre | काणकोण इस्पितळाचा कायापालट होणार; 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश

यावेळी फर्नांडिस यांनी चर्चेत भाग घेताना हे शुल्क खूपच अधिक असल्याने कोणतीच पंचायत इतके शुल्क आकारत नाही, असे सांगून ते १० हजार रुपये करण्याची मागणी केली. ज्यांचे २५ हजार रुपये शुल्क घेण्यात आले त्यांचे १५ हजार रुपये परत करावे,

असे सांगत असताना ते अचानक जमिनीवर कोसळले. यावेळी उपस्थित असलेल्या आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी राज्यात सर्व पंचायतींसाठी फ्लॅट हस्तांतरण शुल्क समान करण्यासंदर्भात विधानसभेत विषय मांडण्याचे ग्रामसभेत आश्वासन दिले.

उर्वरित प्रस्ताव पुढील ग्रामसभेत :

सरपंच ग्रामसभा दुर्दैवी घटनेमुळे आटोपती घेतल्यानंतर सांताक्रूझ पंचायत सरपंच जेनिफर ऑलिव्हेरा यांनी सांगितले की, ग्रामसभेत पंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. ग्रामसभेतील उर्वरित प्रस्ताव पुढील ग्रामसभेत घेण्यात येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news