विवाहास नकार दिल्याने कर्नाटकात हिंदू महिलेची मुस्लिमाकडून हत्या File Photo
गोवा

Goa Crime News | गोवा हादरला! मोबोर समुद्रकिनाऱ्यावर 27 वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या; कोलवा पोलिसांकडून तिघांना बेड्या

Goa Crime News | कोलवा पोलिसांकडून तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

केळशी परिसरातील मोबोर समु-द्रकिनाऱ्यावर २७ वर्षीय शशी लाक्रा या तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली आहे. संजय जोगेश्वर मांझी (वय ३० वर्षे, रा. रायगड-छत्तीसगड), आशिष कुमार (१८, रा. जशपूर-छत्तीसगड) आणि जगनंदन दुलारसाई सिदार (२२, मूळ छत्तीसगड, सध्या रा. बेतुल) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मद्याच्या नशेत झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मोबोर समुद्रकिनाऱ्याजवळील 'द बायके हेरिटेज ओल्ड अँकर रिसॉ र्ट'च्या परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची माहिती कोलवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तिथे पोलिसांना २७ वर्षीय शशी लाक्रा याचा मृतदेह आढळून आला. संशयितांनी लाक्रा याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. मानेवर झालेल्या खोल जखमेमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. २३ मे रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी मृत शशीचा भाऊ रोशन राम लाक्रा याने दिलेल्या तक्रा-रीवरून कोलवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णाल-याच्या शवागारात पाठवला आहे.

संशयित तसेच मृत शशी हे सर्वजण मच्छीमारी बोटीवर काम करणारे कामगार असून, मद्याच्या नशेत त्यांच्यात झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे. कोलवा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT