चंद्रपूरात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेवर कारवाई Chandrapur News
गोवा

Goa Crime Branch | गोव्यात हायप्रोफाईल एस्कॉर्ट वेबसाईटचा पर्दाफाश! क्राईम ब्रँचकडून नेरूल-पिळर्णमध्ये तिघांना अटक

Goa Crime Branch | क्राईम ब्रँचची धडक कारवाई; तिघांना नेरूलमधून अटक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत एस्कॉर्ट वेबसाइटस्च्या माध्यमातून आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे जाळे चालवणाऱ्या तिघांना नेरूल-पिळर्ण अटक केली आहे. अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या वेबसाइटस् तयार करणे, चालवणे आणि व्यवस्थापन करणे या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली.

न्यायालयाने तिघांना ३ दिवसांची कोठडी दिली असून त्यांच्याकडून ५ मोबाईल, एक लॅपटॉप जप्त करून बँक खात्यांवरील २.५ लाख रुपये गोठवले आहेत. या कारवाईवेळी अटक करण्यात आलेल्यांची नावे व्ही. नारायण राव (४०, शिवमोगा, कर्नाटक), शाहबाज खान (३३, भोपाळ, मध्य प्रदेश) व मंजुनाथ शाहशेट्टी (३६, बिदर, कर्नाटक) अशी आहेत.

छाप्यात संशयितांकडून एस्कॉर्ट साइटवर वापरला जाणारा मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच तपासात समोर आले की, संशयितांनी पीडित महिलांकडून गुगल पे व यूपीआयद्वारे पैसे घेतले होते. त्यामुळे वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायद्याखाली कलम ४ खाली गुन्हा नोंद करण्यात आळा आहे.

सुमारे २.३४ लाख रुपये गोठवले

क्राईम ब्रँच सध्या आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करत असून पीडित महिलांचा शोध घेत आहे. मुख्य संशयिताच्या खात्यातील सुमारे २.३४ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक (गुन्हे शाखा) राहुल गुप्ता, आयपीएस यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिवबा दळवी (पोलिस अधीक्षक) यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT