Prashant Kakode pudhari photo
गोवा

Goa Cricket Association : प्रशांत काकोडे 'जीसीए' समितीतून निलंबित

मुलगा मनीष काकोडे याला 'जीसीए'च्या संघ निवडीतून वगळण्याची मागणी लोकपालांनी फेटाळून लावली.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रशांत काकोडे येण्यासारखा मुलाच्या सक्रिय क्रिकेट कारकिर्दीमुळे निर्माण झालेला हितसंबंधांचा संघर्ष टाळता येण्यासारखा नसल्याचे नमूद करत गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) नैतिकता अधिकारी तथा लोकपालांनी व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रशांत काकोडे यांना तत्काळ निलंबित केले आहे. मात्र, त्यांचा मुलगा मनीष काकोडे याला 'जीसीए'च्या संघ निवडीतून वगळण्याची मागणी लोकपालांनी फेटाळून लावली.

मनीषविरुद्ध गैरप्रकार, अनुचित निवड किंवा गुणवत्तेचा अभाव असल्याचे कोणतेही निष्कर्ष नोंदवण्यात आलेले नाहीत. माजी क्रिकेटपटू सुदिन विनायक कामत यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली. काकोडे यांच्या मुलाने गोव्याच्या २३ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याचा रणजी चषक शिबिरात समावेश झाला.

त्याचवेळी प्रशांत काकोडे हे 'जीसीए'च्या व्यवस्थापन समितीवर मतदानाचा अधिकार असलेले सदस्य होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) हितसंबंध संघर्षासंबंधी नियमांचा भंग झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. दरम्यान, तक्रारदार सुदिन विनायक कामत यांनी मनीष काकोडे याला 'जीसीए' संघ निवडीतून वगळण्याची केलेली मागणी लोकपालांनी स्पष्टपणे फेटाळली.

हितसंबंध संघर्ष घोषणापत्राबाबत निर्देश

'जीसीए'च्या सर्व अधिकारी आणि समिती सदस्यांनी अनिवार्य हितसंबंध संघर्ष घोषणापत्र सादर केले आहे की नाही, याची खातरजमा करण्याचे निर्देश सचिवांना देण्यात आले आहेत. ज्यांनी अद्याप घोषणा केलेली नाही, त्यांना १५ दिवसांत ती सादर करण्याची औपचारिक नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई किंवा स्वेच्छा कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT