ठळक मुद्दे
काँग्रेसने ZP निवडणुकांसाठी तिसरी (12 उमेदवार) आणि चौथी (3 उमेदवार) अशी एकूण 15 नावे जाहीर केली.
उत्तर गोव्यात 8 उमेदवार तर दक्षिण गोव्यात 7 उमेदवार जाहीर करण्यात आले.
यादीत महिला, ओबीसी व खुल्या श्रेणीतील उमेदवारांचे संतुलित प्रतिनिधित्व दिसते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Amit Patkar यांनी दोन्ही याद्या अधिकृतपणे प्रसिद्ध केल्या.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसने मंगळवारी आपली तिसरी आणि चौथी उमेदवार यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत उत्तर व दक्षिण गोव्यातील प्रत्येकी 6 म्हणजेच 12 उमेदवार आहेत. चौथ्या यादीत उत्तरेतील २ तर दक्षिणेतील १ उमेदवार आहे.
उत्तरेतील ८ उमेदवारांमध्ये (मतदारसंघ, उमेदवार, आरक्षण या क्रमाने) हरमल नॅटी फर्नांडिस (महिला), मोरजी - प्रियंका दाभोलकर (ओबीसी महिला), शिवोली रोशन चोडणकर (खुला), शिरसई नीलेश कांबळी (खुला), खोर्ली ग्लेन काब्राल (खुला), सेंट लॉरेन्स -उज्ज्वला नाईक (महिला ओबीसी), हणजूण योगेश गोवेकर (ओबीसी), नागरगाव नंदकुमार कोपर्डेकर (खुला) यांचा समावेश आहे.
-दक्षिणेतील ७ उमेदवारांमध्ये नुवे अँथोनी ब्रेगंझा (ओबीसी), कोलवा -वेनिसिया कारवाल्हो (खुला), बाणावली लुईझा रॉड्रिग्ज (खुला), दवर्ली फ्लोरियानो फर्नांडिस (ओबीसी), नावेली मेलिफा कार्दोज (महिला ओबीसी), धारबांदोडा दीनानाथ गावकर (खुला), बोरी प्रणोती शेटकर (महिला) यांचा समावेश आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.