Tourist Security Goa 
गोवा

Tourist Security Goa | पर्यटकांच्या खोलीचा दरवाजा 'मास्टर की'ने उघडण्याचा प्रयत्न

Tourist Security Goa | कोलवातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

पर्यटनासाठी जागतिक स्तरावर ओळख असलेल्या गोव्यात पर्यटकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना दक्षिण गोव्यातील कोलवा येथे समोर आली आहे. कोलवा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये ठाणे-मुंबई येथून सुट्टीसाठी आलेल्या पर्यटक प्राजक्ता चिटणीस आणि त्यांच्या कुटुंबासोबत घडलेल्या कथित प्रकारामुळे राज्यातील पर्यटन व्यवस्था, हॉटेल सुरक्षा आणि पर्यटकांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता चिटणीस या आपल्या कुटुंबासह कोलवा येथील 'गोल्डन क्राऊन' हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या. दिवसभर पर्यटन करून कुटुंबीय रात्री झोपेत असताना हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने कोणतीही पूर्वपरवानगी किंवा सूचना न देता 'मास्टर की'च्या सहाय्याने त्यांच्या खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले.

दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय जागे झाले आणि त्यांनी तातडीने दरवाजाकडे धाव घेतली. त्यावेळी संबंधित कर्मचारी खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न करत होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीय भयभीत झाले. पर्यटकांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत त्याचा व्हिडीओ चित्रीत केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT